सावळीविहीर(प्रतिनिधी):
कोपरगाव- अहमदनगर या राज्य महामार्ग क्रमाक-१० वरील कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पुलाचे बांधकाम चार टप्प्यात करण्यात येणार असून हे दुरुस्तीचे काम जागतिक बँक प्रकल्पाद्वारे डायमंड कन्स्ट्रक्शन कंपनी लोणी यांना देण्यात आले आहे. हे पुलाचे दुरुस्तीचे काम चार टप्प्यात होणार असून पहिला टप्पा चार जानेवारी ते पाच जानेवारी तर दुसरा टप्पा आठ जानेवारी ते नऊ जानेवारी तिसरा टप्पा अकरा जानेवारी व चौथा टप्पा 13 जानेवारी अशा चार टप्प्यात एक काम होणार असून या दरम्यान वाहतूक वळविण्यात येणार आहे.
तरी कोणाच्या त्या संदर्भात हरकती असतील तर त्यांनी त्या द्यावयाचे असल्यास त्या जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे समक्ष किंवा ई-मेलने द्याव्यात,असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एका पत्रकान्वये केले आहे, या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोपरगाव- अहमदनगर या महामार्गावर कोल्हार येथे प्रवरा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून या दरम्यान या महामार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. अमदनगर कडून येवला मनमाड मालेगाव आदी भागात जाणारी जड वाहने ही अहमदनगर नेवासा फाटा, कायगाव टोका, गंगापूर मार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच दुचाकी चारचाकी ही वाहने अहमदनगर कडून कोपरगाव मनमाड कडे जाणार असतील तर ते राहुरी फॅक्टरी, बेलापुर श्रीरामपूर बाभळेश्वर अशी करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे शिर्डी कडून अमदनगर कडे जाणारी सर्व वाहतूक ही कोल्हार बेलापूर राहुरी फॅक्टरी अहमदनगर अशी कळवण्यात येणार आहे.
श्रीरामपूर ते बाभळेश्वर हा एकेरी मार्ग राहणार आहे, तसेच कोल्हार ते बेलापूर हा एकेरी मार्ग राहणार आहे .तरी वाहनधारकांनी याची नोंद घेऊन कोणाच्या काही यासंदर्भात हरकती असल्यास त्या जिल्हा विशेष शाखेला कळवायचे आहेत. असेही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .त्यामुळे लवकरच कोल्हार येथील पूल होणार आहे, प्रवरा नदीवर दोन पूल आहेत. एक जुना व एक नवा पूल आहे.मात्र जुन्या पुलावरून वाहतूक बंद आहे.नवीन पुलावर वाहतूक सुरू होती मात्र त्यालाही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हा पूल ही धोकादायक झाला असून अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची गरज असल्याची वाहनधारक मागणी होती.त्यामुळे हा पूल लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे समजते.

