shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्याहाळी केंद्रातील ५०%शिक्षकांचे पहिल्या टप्प्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम प्रशिक्षण उत्साहात संपन्न..!!


इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
कौठळी: दि. १० डिसेंबर२०. रोजी जि. प .प्राथ. शाळा व्याहाळी येथे व्याहाळी केंद्रातील ५०% शिक्षकांचे पहिल्या टप्प्यातील शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम प्रशिक्षण उत्साहात पार पडले.प्रशिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा पूजनाने झाली.प्रतिमा पूजन आशा नष्टे,रत्नप्रभा भोंग व प्रतिभा जौजाळ यांच्या हस्ते झाले.प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी केले.


सुलभक गणेश लाळगे सरांनी शैक्षणिक गुणवत्तेचे परिणाम,गुणवत्ता संमोधन तक्ता, शैक्षणिक गुणवत्ता निर्मिती,अध्ययन अध्यापन नियोजन,वेळापत्रक यावर सखोल चर्चात्मक मार्गदर्शन केले.सुलभक सुनील पवार सरांनी शिष्यवृत्ती साठी सराव प्रश्नसंच, शिक्रापूर पॅटर्न,विध्यार्थी प्रश्नपत्रिका सराव, लोकसहभाग,सह शालेय उपक्रम यावर सखोल माहिती दिली.नंतर ज्या शिक्षक पाल्यांनी सीईटी परीक्षेत यश मिळवले आहे. अशा नंदकुमार सूर्यवंशी  व सावता नाळे यांचा सन्मान व्याहाळी केंद्राच्या वतीने करण्यात आला.भारत ननवरे यांनी मनोगत व्यक्त केले.आभार बापूराव जाधव सरांनी मानले.
close