shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी २० हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात..!!

पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एसीबी पथकाने धडक कारवाई करत एका कर्मचाऱ्याला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकले आहे. कारवाईत वरिष्ठ असल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्याबाबत अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. यातील तक्रारदार यांना पोलीस सुरक्षा पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या कर्मचाऱ्याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती.

यानुसार आज साडे आठ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान एसीबीने पकडलेला कर्मचारी सहाय्यक उपनिरीक्षक असल्याचे समजते. त्याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एका अधिकाऱ्याचे नाव असल्याचे बोलले जात आहे. पण त्याबाबत अद्याप काहीच माहिती समोर येत नाही.
close