shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन ट्रॅफिक पोलीस मित्र बनण्यासाठी ‘pcmc smartsarathi’ वर नोंदणी करा..!!


पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने पुढाकर घेतला आहे. ट्रॅफिक पोलीस मित्र बनण्यासाठी pcmc smartsarathi ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेने ट्विटरवरुन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या काही भागात वाहतूक कोंडी होते. वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शहराची वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने पुढाकार 
घेतला आहे.

‘वाहतूक पोलिसांचे काम लई भारी, प्रशासनाला सहाय्य करुन पार पाडू जबाबदारी’ याअंतर्गत वाहतूक समन्वय समितीमध्ये सहभागी होवून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहाय्यक करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

ट्रॅफिक पोलीस मित्र बनण्यासाठी pcmc smartsarathi या ॲपवर नोंदणी करण्याचे आवाहन महापालिकेने ट्विटरवरुन केले आहे.
close