shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 487 पोलिसांना आयुक्तांकडून नवीन वर्षानिमित्त पदोन्नतीची खास भेट


पिंपरी चिंचवड:-पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 487 पोलिसांना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदोन्नती देऊन नवीन वर्षानिमित्त खास भेट दिली आहे. यामुळे शहर पोलीस दलात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांपैकी 272 अंमलदारांना पोलीस शिपाई ते पोलीस नाईक, 150 अमंलदारांना पोलीस नाईक ते पोलीस हवालदार, तसेच 65 अंमलदारांना पोलीस हवालदार ते सहायक पोलीस फौजदार, अशी पदोन्नती देण्यात आली आहे.

एकूण 487 अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्तांनी 31 डिसेंबर रोजी काढले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “पोलीस अंमलदार हे पोलीस दलाचा पाया आहेत. ते दिवस-रात्र समाजाच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. अशावेळी त्यांच्या कामाचे कौतुक करून मनोबल वाढवल्यास त्यांना अधिकाधिक उत्कृष्ठ कर्तव्य बजावता येईल.

या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील एकूण 487 पोलीस अंमलदारांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली.”
close