यशस्वी उपचारासाठी सकारात्मक विचार आणि मनोबलाची देखिल मोठी आवश्यकता...डाॅ.अमोल रासकर..!!
इंदापूर प्रतिनिधी: (दि. ११जाने.२१) इंदापूर शहरानजीक असणाऱ्या म्हेत्रेवस्ती येथील बाळासाहेब म्हेत्रे व कुटुंबातील पाच सदस्यांनी कोरोनावर मात करत कोरुनामुक्त होऊन घरी परतले.
गेल्या पंधरवडया पासून या कुटुंबावर इंदापूर शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु होते. रविवार दि.१० जानेवारी रोजी त्यांना कोरोनावर मात केल्याने घरी सोडण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते इतरांना सतत मदत करणारे बाळासाहेब म्हेत्रे व कुटुंबीयांचे त्यांच्या शेकडो शुभचिंतकांनी वाजत - गाजत मिरवणूक काढून तोफांची सलामी देत जंगी स्वागत केले .यानंतर म्हेत्रे कुटुंबातील सर्व सदस्यांचा व उपस्थित सर्व डॉक्टर यांचा सत्कार म्हेत्रे वस्ती येथे करण्यात आला.
म्हेत्रे यांचे संपूर्ण कुटुंबावर उपचार इंदापूर शहरातील लाईफ केअर अँण्ड आय.सी.यू.सेंटर मध्ये डाॅ.अमोल रासकर आणि डाॅ.मनोज वाघमोडे यांनी उपचार केले. बाळासाहेंबांच्या कुटुंबातील पाच व्यक्तींमध्ये त्यांचे वडील व आई हे वयस्कर असल्याने मोठी चिंता होती. मात्र डाॅक्टरांनी केलेल्या उपचाराला ८५ वय असणारे वडील व ८३ वयाच्या आई यांच्या शरीर प्रकृतीने चांगला प्रतिसाद दिलाने दोहोंचाही कोरोना रोगातून मुक्तता मिळून नवा जन्म झाला. आज याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता .
याप्रसंगी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक,डाॅ.एकनाथ चंदणशिवे,डाॅ.सुहास शेळके,डाॅ.अमोल रासकर,डाॅ.अमोल शेंडे,डाॅ.नामदेव गार्डे, कर्मयोगीचे संचालक अतुल व्यवहारे,संदीप दोशी,माजी संचालक सतिश व्यवहारे,सागर सुर्यवंशी,दिपक रायकर, सागर व्यवहारे,केदार पेटकर,गोपाळ म्हेत्रे,संजय गार्डी,विलास गडदे,बापू घोगरे,संतोष निगडे यांसह म्हेत्रेवस्ती व माळवाडी ग्रामपंचायत मधील शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदणशिवे म्हणाले की, देशातून अद्याप कोरोना गेलेला नाही. प्रत्येकाच्या घरात वयोवृद्ध व्यक्ती आहेत.आपण दिवसभर घराबाहेर फिरतो मात्र फिरताना आपण हवी ती काळजी घेत नाही. यामुळे आपणांस तर धोका आहेच मात्र आपल्या घरातील वयोवृद्धना आपल्यापासून कोरोनाचा अधिक धोका आहे. हे विसरू नये. यासाठी प्रत्येकाने घराबाहेर फिरताना आवश्यक ती काळजी घ्यावी. म्हेत्रे कुटुंबाला मी भविष्यातील निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो.
डाॅ.अमोल रासकर म्हणाले की, म्हेत्रे परिवारावर उपचार करण्याची जी संधी मिळाली ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे.मला यातून खुप काही शिकायला मिळाले. आम्ही जे उपचार करत होतो त्यापेक्षा त्यांच्या आई आणि वडील व घरातील मंडळी यांची कोरोनावर मात करण्याची इच्छाशक्ती खूप मोठी होती. शेवटी डाॅक्टर उपचार करतात मात्र रुग्णाने देखील आपले मनोबल उंचावले पाहिजे. यशस्वी उपचारासाठी सकारात्मक विचार आणि मनोबलाची देखिल मोठी आवश्यकता असते. सध्या इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा संचार पहायला मिळतो. मात्र बरेचसे नागरिक मास्क वापरत नाहीत. मास्क वापरणे ही काळाजी गरज आहे. कोरोना गेला हा गैरसमज न करता शासनाने घालून दिलेले सर्व नियम कटाक्षाने पाळून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान डाॅ.सुहास शेळके, डाॅ.नामदेव गार्डे,डाॅ.अमोल शेंडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश व्यवहारे यांनी केले.
याठिकाणी बाळासाहेब म्हेत्रे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,कोरोना हा आजार गंभीर नाही.त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.खचू नका मनोबल वाढवा,आपण कोरोनावर नक्की मात करु शकतो.समाजाने देखील कोरोना झालेल्या रुग्णाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलून त्यास माणसिक आधार देणे या काळात खुप गरजेचे आहे.मी व माझे कुटुंब कोरोनावर मात करणारचं हा विचार मनात पक्का होता. आम्हाला डॉक्टरांनी योग्य उपचार ही दिले त्याबद्दल मी सर्वांचे रुण व्यक्त करतो.

