shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले लाचखोर महिला पोलीस रंगेहात जाळ्यात..!!

पुणे:-भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला 5 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
श्रद्धा अकोलकर असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ ठाण्यात श्रद्धा कार्यरत आहेत. तक्रारदार यांना त्यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीच्या पथकाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सापळा रचून कारवाई करण्यात आली. एसीबीने श्रद्धा अकोलकर यांना 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
close