shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते पत्रकार शिवाजी घाडगे यांचा सन्मान..!

राहुरी -
केंद्रीय जल मंत्रालयाचे वतीने राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाले बद्दल पत्रकार शिवाजी घाडगे यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांचे हस्ते राहुरी येथे जल पुरस्काराचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करणेत आला. 

या प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन संस्थापक रामभाऊ काळे, पुणमचंद सुराणा, प्रदिप सुराणा आदी उपस्थित होते.आपल्या क्षेत्रात जल जागृती करणाऱ्या राजकीय व माध्यम क्षेत्रांतील दोन पाणीदार व्यक्तिमत्व राहुरी येथे भेटले,  अण चर्चा रंगली ती पाण्याच्या जपनुकी बरोबर नदी जल जोड प्रकल्प अस्तित्वात येण्या विषयी..,

पद्मश्री पोपटराव पवार व ज्यांच्या  बातम्याना राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला असे राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार शिवाजी घाडगे यांची शनिवारी राहुरी येथील प्रथितयश व्यावसायिक प्रदिप सुराणा याच्या निवासस्थानी पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट झाली..,  यावेळी पोपटराव यांच्यावर ग्रामपंचायत निवडणूक मध्ये हिवरे बाजार करानी पुन्हा विश्वास दाखविला याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन संस्थापक रामभाऊ काळे , पुणमचंद सुराणा,  प्रदिप सुराणा , आदीनी पोपटराव यांचा स्नेह सत्कार केला.

गेल्या तीस वर्षा पासुन आदरणीय पोपटराव पवार साहेब हे देशात जल जागृतीचे काम  करत आहेत,  तर पंचवीस वर्षा पासून माध्यम क्षेत्रात राहुरी चे पत्रकार शिवाजी घाडगे जल प्रबोधन व मार्गदर्शनाचे काम करत आहेत.

या प्रसंगी बोलताना पवार साहेब म्हणाले की,   आपल्याकडे ७० टक्के भूभाग हा ग्रामीण शेतीवर अवलंबून असल्याने नदी जोड प्रकल्प अस्तित्वात येणं जरुरीचे आहे.  तसेंच नद्या शुद्ध व स्वच्छ ठेवाण्यासाठी नागरिकांनी पुढे यायला हवे.. समाजात चांगले काम करणारे लोक अनेकांना अडचण ठरत असले तरी चांगले काम करणारयाना लोक साथ देत असतात हेही तितकेच खरे आहे असे पोपटराव पवार शेवटी बोलताना म्हणाले..
close