-पत्रकार लियाकतखान पठाण यांचे उपोषण-
नाशिक (प्रतिनिधी)- शासनाचे नियम अक्षरशः धाब्यावर बसवून, संगमनेरच्या तलाठी कार्यालयात खाजगी नोकरांच्या प्रचंड हस्तक्षेप वाढला आहे, या हस्तक्षेपाविरुद्ध पत्रकार लियाकतखान पठाण यांनी नाशिक महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरु केले असून मा.महसूल आयुक्त साहेबांनी याकडे वेळीच लक्ष घालून संगमनेर तलाठी कार्यालयातील खाजगी नोकरांना तात्काळ कामावरुन कमी करण्याचे आदेश द्यावे अशी उपोषणकर्ते पत्रकार लियाकतखान पठाण यांची रास्त मागणी आहे.
गत दोन आडीच वर्षांपासून पत्रकार लियाकतखान पठाण सातत्याने याबाबत मंत्रालय, महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे योग्य पाठपुरावा करत आहेत, शिवाय महसूलमंत्री देखील संगमनेरचेच आहेत,जर दस्तूरखुद्द महसूल मंत्र्यांच्याच गावांत असे गैरप्रकार होत असेतीलतर राज्याच्या इतर जिल्ह्यांत काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी असे येथील जागरुक नागरीकांकडून नेहमीच बोलले जात असल्याने, तथा महसूलमंत्री मा .ना.बाळासाहेब थोरात हे आमच्यासाठी केवळ महसूलमंत्रीच नसून एक प्रमाणिक, खरे तथा निस्वार्थी, निर्पेक्ष राजकर्ते असल्याने ते आमचे सन्मानिय नेते आहेत, त्यांची संगमनेर तलाठी कार्यालयाच्या या मनमानी कारभारामुळे जर नाहक बदनामी होत असेलतर ते आम्ही कदापी सहन करु शकत नाही,याकरीता पत्रकार लियाकतखान पठाण यांची ही धडपड आहे.
इतकं करुनही संगमनेर तलाठी कार्यालयाचे तलाठी भाऊसाहेंबांच्याकृपाशिर्वादाखाली चालु असलेला संगमनेर तलाठी कार्यालयातील खाजगी नोकरांचा उपद्रव्य काही थांबता थांबेना, याकरीता पत्रकार लियाकतखान पठाण यांच्यावर आज उपोषण करण्याची वेळ आली आहे ही अत्यंत दुर्देवी बाब म्हणावी लागेल,
आता तरी माननीय महसूल आयुक्त साहेबांनी या उपोषणाची गंभीर दखल घेऊन संगमनेर तलाठी यांच्यावर योग्य कारवाई करावी तथा या कार्यालयात खाजगी नोकरांकरवी होत असलेली जनतेची लयलूट त्वरित थांबविण्यात यावी ,त्यांना तात्काळ कामावरुन कमी करण्यात येऊन मा.महसूलमंत्री यांच्यासह संपूर्ण महसूल प्रशासनाची होत असलेली बदनामी त्वरित थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही पत्रकार लियाकतखान पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

