shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात रायगड जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे...!!

राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:
 समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे प्रजासत्ताकदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपविभागीय अधिकारी श्रीम.शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीम.उज्वला बाणखेले, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग राहुल मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम.शितल पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, विशाल दौंडकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, प्रविण बोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
close