मुंबई दि. २५ :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे व दि. २५ जानेवारी रोजी ते गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राजभवनातून उ स्पष्ट करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राजभवनकडून देण्यात आले आहे.
संयुक्त शेतकरी मोर्चाचे श्री धनंजय शिंदे यांना दि. २२ जानेवारी रोजी दूरध्वनीद्वारे तसेच निमंत्रक श्री प्रकाश रेड्डी यांना दि. २४ जानेवारी रोजी लेखी पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. श्री. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाद्वारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच श्री प्रकाश रेड्डी यांना याबाबतचे लेखी पत्र दिनांक २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राजभवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्वीकारतील असेदेखील श्री. धनंजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते व तसे स्वीकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाद्वारे कळविले होते.

