shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवड दापोडी मध्ये एसटी वर्कशॉपजवळ सापडले कुजलेल्या अवस्थेतील अर्भक..!


पिंपरी चिंचवड:-सांगवी -दापोडी रोडवरील एसटी वर्कशॉपच्या जवळ कुजलेल्या अवस्थेतील एक अर्भक सापडले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) दुपारी उघडकीस आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील एसटी वर्कशॉपच्या जवळ एक मृत अर्भक असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी अर्भकाचे पाय आणि शरीराचा काही भाग कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.


मिळालेल्या अवयवांवरून मयत अर्भक हे स्त्री आहे की पुरूष हे समजू शकले नाही. मिळालेले अवयव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. त्यानंतर हे अर्भक किती दिवसांचे आहे आणि किती दिवसांपूर्वी टाकून दिले आहे, याबाबतची माहिती मिळेल, असे पोलीस निरीक्षक अवताडे यांनी सांगितले.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
close