सदर घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधना अण्णासाहेब हासे रा. चिखली ता. संगमनेर या महिलेने फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. साधना हासे ह्या मोशी ता. हवेली जि. पुणे येथे सध्या राहत आहे.
साधना हासे ह्या पुणे येथे जाण्यासाठी संगमनेर बसस्थानक येथे आल्या होत्या. नाशिककडून आलेल्या बस मध्ये त्या बसत असताना त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले.
याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

