इंदापुरात ६ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतन इमारतीचे होणार उद्घाटन-दत्तात्रेय भरणे..!!
इंदापूर प्रतिनिधी:(दि.३१)इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा इंदापूर नूतन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नूतन इमारतीच्या पाहणी करताना व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी नूतन इमारतीच्या सर्व बाबी स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित यांना इमारतीच्या काही दुरुस्त्या व्यवस्थित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. यानंतर इंदापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये सदर कार्यक्रमाची सभा आयोजित करण्यात आली असून त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी भरणे यांनी केली. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,
जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे,
नगरसेवक पोपट शिंदे,नगरसेवक अनिकेत वाघ, प्रा. अशोक मखरे,नगरसेवक स्वप्नील राऊत, मा. नगरसेवक दादासाहेब सोनावणे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे, दत्तात्रेय घोगरे,तात्या वडापुरे, बाळासाहेब व्यवहारे, निलेश घोलप, रवींद्र कासार , पुणे जिल्हा विभागीय अधिकारी आनंदराव थोरात, वसुली अधिकारी अर्जुन साहेब , बँकेचे सर्व अधिकारी इतर मान्यवर इत्यादी उपस्थित होते

