सावळीविहीर( प्रतिनिधी) :
हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद यांनी आज शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. अभिनेते सोनू सूद हे कोरोणानंतर प्रथमच शिर्डीला आले होते.
सोनू सूद आपल्या कारमधून उतरले असता त्यांना उपस्थित साईभक्त व प्रेक्षकांनी पाहताच मोठी गर्दी केली. नंतर त्यांनी साई समाधी मंदिरात जाऊन श्री साईबाबांची मध्यान आरती केली व श्री साईबाबाचे मनोभावे दर्शन घेतले. कोरोणा काळात श्री साईबाबांचे मंदिर बंद होते.
त्यामुळे साईभक्त येत नव्हते. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज नेते हे श्री साईबाबांच्या दर्शनाला नेहमी येत असतात. मात्र कोरोणा काळात मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे या काळात कुणी आले नव्हते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच व श्री साई मंदिर दर्शनासाठी खुले करताच प्रथमच हिंदी चित्रपटातील दिग्गज असे अभिनेते सोनू सूद यांनी शिर्डीला येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. सोनू सूद यांना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.सोनू सूद यांनीही ही हात उंचावून अभिवादन चाहत्यांना केले.

