shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर मध्ये माय लेकांचा भीषण अपघातात मृत्यू..!!

  संगमनेर । प्रतिनिधी(ऋषिकेश जगताप) :
संगमनेर शहरातील साईनगर परिसरातील माय लेक नातेवाईक रुग्णाला भेटीसाठी जात असताना सिन्नरजवळ इनोव्हा कार व दुचाकी यांच्यात जोराची धडक बसल्याने अपघात होऊन मायलेकांनी आपला जीव गमविला आहे. शनिवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अमोल पवार व शकुंतला पवार रा. साईनगर, संगमनेर असे या अपघातात मृत्यू झालेल्या माय लेकांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की,  घोटी येथील रुग्णालयात नातेवाईक यांना भेटण्यासाठी अमोल व त्याची आई शनिवारी दुपारी घोटीकडे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

 सिन्नर पासून काही अंतरावर घोटीकडे जात असताना त्यांच्या दुचाकी व इनोव्हा कार यांच्यात जोराची धडक बसली यामध्ये दोघांच्या डोक्याला जबर मार लागला होता. त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले होते मात्र दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने साईनगर येथे शोककळा पसरली आहे.
close