shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानी भरणेवाडी (ता. इंदापूर)नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सोहळा संपन्न..!!

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या निवास्थानी भरणेवाडी (ता. इंदापूर)नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सोहळा संपन्न..!!
इंदापूर : प्रतिनिधी 

तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत  निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान सोहळा राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील निवासस्थानी आज (दि. २४)  रोजी पार पडला.

यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांंबरोबरच सर्वसामान्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
यावेळी उपस्थित नूतन ग्रामपंचायत सदस्यांचे राज्यमंत्री  भरणे यांनी अभिनंदन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच पराभूत झालेल्या युवा व जेष्ठ सदस्यांना मानसिक आधार देऊन आपल्या गावातील विकासकामांसाठी इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र राज्याचा मंत्री या नात्याने कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही आ.भरणे यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  प्रदिप गारटकर,पुणे जिल्हा सरचिटणीस वसंत आरडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, जेष्ठ नेते हनुमंत बनसोडे, बाळासाहेब करगळ,  दत्तात्रय घोगरे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक  रणजित निंबाळकर, माजी संचालक तेजसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा रेहना मुलाणी, इंदापूर तालुका महिला अध्यक्षा  छाया पडसळकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, कार्याध्यक्ष  सचिन खामगळ यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.

=
close