shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जुन्या सांगवीत पादचारी तरुणावर गोळीबार पिंपरी चिंचवड शहरात घटना..!!

पिंपरी चिंचवड:-रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणावर अनोळखी व्यक्तीने जवळून गोळी झाडली. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडली असून यात तरुण जखमी झाला आहे.

आनंद ललित कुमार सोलंकी (वय 30, रा स्पायसर कॉलेज रोड, जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आनंद हे त्यांची पत्नी आणि एका तीन वर्षांच्या मुलीला घेऊन रस्त्याने पायी चालत जात होते. शितोळे पेट्रोल पंप परिसरात मोबाईल फोनवर बोलत जात असताना एक अनोळखी व्यक्ती आनंद यांच्या पाठीमागून आला. त्या अनोळखी व्यक्तीने पाठीमागून आनंद यांच्यावर गोळी झाडली.

गोळी आनंद यांच्या कानाला लागली आहे. त्यांना औंध येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
close