हळदा येथे आशा फार्मर प्रोड्युसर कंपनी चे आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न।
कंधार। प्रतिनिधी : हळदा येथे काल शुक्रवारी आशा फार्मर्स प्रोड्युसर गूळ कंपनीचे मोठ्या उत्साहात लोहा कंधार विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
या वेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा आशा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे , सुरज ग्रुप चे चेअरमन रमेशजी पारसेवार, जि.नि.समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे,जि. प.सद्यस्य चंद्रसेन पाटील, माजी जि.प.स.शंकूतला ताई रावसाहेब पा.शिंदे, श्रद्धाताई संजय पा. शिंदे,लोहा खरेदी वि.स.सभापती स्वप्नील पा. उंमरेकर, जि.नि.स. सद्यस्य बालाजी वैजाळे, तहसिलदार व्यंकटेश मुंढे, श्यामगीरी महाराज दापशेडकर, कंधार कृ. उ.बा. स. सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे,उपसभापती अरुण पाटील कदम,ता.कृ.अधिकारी रमेश देशमुख, भास्करराव पा. जोमेगावकर,लोहा ख. वि. स.उपसभापती श्याम अण्णा पवार , प्रमुख वक्ते उस्मानाबाद चे प्रगतिशील शेतकरी पांडुरंग आव्हाड, पोखरणी येथील डॉ. देविकांत देशमुख सह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले कि लोहा कंधार मतदार संघातील शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी व माझे सर्व कुटुंब सदैव कटिबद्ध असून येण्याऱ्या काळात मतदार संघातील शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावण्यासाठी लागण्याऱ्या सर्व सोयी सुविधा शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी मी या भागाचा आमदार म्हणून सैदेव कटिबद्ध असून येणाऱ्या काळात मतदार संघातील शेतकऱ्यांना शेती सोबत दूध डेअरी,शेळी पालन ,कुंकूट पालन, असे विविध शेती पूरक वेवसाय उभारण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ती मदत व उपाय योजना अंमलात आणल्या जाणार असून मतदार संघातील शेतकऱ्यांनी पैस्याची व वेळेची बचत करण्यासाठी गट शेतीचा जास्त प्रमाणात अवलंब करावा व आधुनिक शेतीची कास धरण्याची गरज असल्याचे आ. शिंदे यांनी बोलतांना स्पष्ट केले.
आम्ही स्टेज वरून कोणालाही पोकळ आश्वासने देत नसून शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रामाणिक पणे प्रश्न सोढवण्याचे काम करतो व या पुढे ही करत राहील असे आ.शिंदे यांनी बोलतांना सपष्ठ केले.
मी कार्यकर्त्यांच्या सदैव भक्कम पाठीशी....!
कार्यकर्त्यांनो जि.प.च्या कामाला जोमाने लागा--आशा ताई शिंदे.
लोहा व कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विजयी उमेदवारांचे या वेळी आशाताई शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्या दिल्या, व पराजित उमेदवारांनी खचून न जाता या पुढे अधिक जोमाने येणाऱ्या जि.प. निवडणुकीच्या कामाला लागावे, मी माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या सदैव भक्कम पाठीशी उभी असून कार्यकर्तानी न डगमगता येणाऱ्या जि. प. निवडणुका पूर्ण ताक्तीनिशी लढवण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागून जि. प. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आव्हाहन या वेळी बोलताना आशा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या चेअरमन तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी बोलतांना सांगितले.

