shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सेनगाव येथील डॉ. पायघन दाम्पत्याचा कोविड योद्धा म्हणून सन्मान..!!

हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२४ जानेवारी रविवार रोजी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोलीच्या लाडक्या पालकमंत्री मा. प्रा. वर्षाताई गायकवाड ह्या सेनगाव मध्ये आल्या असता, त्यांच्या हस्ते सरस्वती हॉस्पिटलचे संचालक डॉ. गजानन कृष्णाजी पायघन व डॉ.सौ. सरोज गजानन पायघन यांनी कोरोणा च्या काळात २४ तास रुग्णसेवा दिल्याबद्दल त्यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
     

डॉ.गजानन कृष्णाजी पायघन हे मूळचे सेनगाव तालुक्यातील जयपूर या खेडे गावचे एक गरीब कुटुंबातले, आई-वडील दोघेही शेतकरी असताना, हलाखीच्या परिस्थितीतून त्यांचे शिक्षण झाले व त्यांनी एकच ध्येय समोर ठेवले होते ते म्हणजे डॉक्टर होऊन गोरगरीब रुग्णांची सेवा करणे, यामध्ये त्यांच्या पत्नी डॉक्टर सरोज यांनीही ना हातभार लावला, अशातच आपल्या तालुक्यात आपल्या लोकांची सेवा करण्याचे त्यांनी ठरवले व त्यांनी मागील दोन वर्षापासून सेनगाव येथे स्वतःचे सरस्वती हॉस्पिटल चालू केले व अनेक गरजू गरीब रुग्णांना उपचार देऊन बरे केले, तसेच त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत व अनुभवाचा कस लावत विविध आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही उपचार देऊन बरे केले आणि कोरोणा च्या काळात वास्तविकतः 24 तास रुग्णसेवा करणे हे अशक्यप्राय होते, तरीही त्यांनी हे आव्हान स्वीकारत या काळातही 24 तास रुग्णसेवा दिली व अनेक रुग्णांचे प्राणही वाचवले, तसेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही बांधिलकी जोपासत आतापर्यंत विविध रोग निदान शिबिर आयोजित केली व त्यावरील मोफत उपचारही त्यांनी केले या शिबिरामध्ये असंख्य गोरगरीब गरजू रुग्णांनी लाभ घेतला, तसेच आता त्यांच्या हॉस्पिटलला हिंगोली येथील तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चालू करूनही दिल्या व अनेक वृद्ध लोकांना हिंगोलीला जाने शक्य होत नाही व तसेच त्यांना वेळेवर उपचार घेता येत नाहीत, या व्हिजिट मुळे लोकांचा वेळ आणि पैसाही वाचविण्याची त्यांनी मदत केली, तसेच मुलाच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिबांना अन्नदान ही त्यांनी केले व मोफत वैद्यकीय सुविधा पुरवत महान सत्कार्य त्यांच्या हातून घडत आले. 

असे डॉ. पायघन दांपत्य यांचा सेनगाव मध्ये एक आदर्श निर्माण झालेला असून, त्यांच्या कार्याची दखल घेत सेनगाव वासियां तर्फे व तसेच माननीय पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना कळताच, त्यांनी या दाम्पत्याचा सत्कार करण्याचे ठरवले व सन्मानपत्र देऊन पुष्पहार घालून दोघांचाही सत्कार करण्यात आला यामुळे सेनगाव शहरातील व तसेच सेनगाव परिसरातील जनतेकडून डॉ.पायघन दाम्पत्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
close