shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात महिला पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल..!!


पुणे:-नो पार्किंग’मध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर स्टाफला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत मारहाण केली. 

भरदुपारी पुणे-नगर रस्त्यावरील ऑर्बिट मॉल समोर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वंदना आल्हाट यांनी फिर्याद दिली असून सहा जणांविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी वंदना आल्हाट या वाहतूक विभागात पोलीस कर्मचारी आहेत. बुधवारी दुपारी त्या पुणे-अहमदनगर रस्त्यावर बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई करत होत्या. यावेळी नो पार्किंग मध्ये लावलेल्या एका कारला लावत असताना सहा जणांच्या सोबत त्यांचा वाद झाला. या वादातून सहा जणांच्या टोळक्याने फिर्यादी यांच्यासह त्याच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या सर्व प्रकारानंतर अहमदनगर रस्त्यावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मारहाण केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. फिर्यादी वंदना आल्हाट यांनी विश्रांतवाडी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
close