shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा. फिरोज नसरुद्दीन शेख यांना पी. एच. डी पदवी प्रधान.. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार..!!


प्रा. फिरोज नसरुद्दीन शेख यांना  पी. एच. डी पदवी प्रधान.. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार..!!

*इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)*

इंदापूर: १ जानेवारी २०२०. इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे कार्यरत असलेले प्रा. फिरोज नसरुद्दीन शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी. एच. डी पदवी प्रधान करण्यात आली. प्रा. फिरोज शेख यांनी पी.एच.डी पदवी संपादन केल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला.

  प्रा. फिरोज शेख  यांनी इंग्लिश या विषयात "A Study of Speech Acts with Special Reference to Vijay Tendulkar's Selected Plays."  या विषयावर प्रबंध सादर केला.  प्रा. फिरोज शेख यांना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनाई (अहमदनगर)येथील डॉ संदीप प्रभाकर खेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शेख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Institute of Advanced Studies in English औंध पुणे या अभ्यास केंद्रावर आपले संशोधन पूर्ण केले.
Application Oriented Research असल्यामुळे  अनेक मान्यवरांनी प्रा. फिरोज शेख आणि त्यांच्या प्रबंधाचे कौतुक केले.
    संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव  मुकुंद शहा, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रा. फिरोज शेख यांचे अभिनंदन केले.

close