प्रतिनिधी। विशाल लोंढे :
सत्य एक्सप्रेस चे संपादक देशभक्ती सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र जगताप यांना राज्यस्तरीय युवा संघर्ष पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
प्रेमळ स्वभाव,उत्कृष्ट पत्रकार,सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते, गरिबांना नेहमी मदत करणे, यामुळे पत्रकार रवींद्र जगताप यांनी सामान्य लोकांमध्ये आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. सामाजिक जीवनातील योगदानामुळे त्यांना राज्यस्तरीय युवा संघर्ष पुरस्कार जाहीर झाला आहे. जगताप यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जगताप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक विषयावर प्रकर्षाने प्रकाशझोत टाकला आहे.जगताप हे सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सुद्धा गौरवन्यात आले आहे.
या पुरस्काराचे वितरण २९ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता मातोश्री लॉन्स, मनमाड रोड,चांदवड नाशिक याठिकाणी होणार आहे.

