आत्ताच महाराष्ट्रात पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या आहेत...अनेक जणांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे...! कारण ही संविधानीक लोकशाहीची लढाई आहे. निवडणूक लढवणे हे आपले परमकर्तव्य आहे. ते आपण पार पाडले आहे.यात शंका घेण्याचे कारण नाही.
आज निकाल लागणार आहे. काहींना यश मिळेल तर काहींना अपयश..!अपयश मिळालेल्यांनी खचून न जाता, कोणावर रोष न काढता पुन्हा नव्या उमेदीने चांगले कार्य व कर्म करावे.त्याचा फायदा जीवनात नक्कीच होतो. आणि यश मिळवणारांनी आपल्या गावाच्या विकास कामातून आपली छाप निर्माण करावी. नुसते मोठेपणा मिळतो म्हणून पांढरे कपडे घालून हार तुरे मिळतात आणि सन्मान मिळतो म्हणून व नारळ फोडण्यासाठी आपल्याला मोठेपणा मिळतो म्हणून मोठेपणासाठीच पाच वर्षे जीवनातले वाया घालू नका...! कारण अनेकांना आपल्याला जनतेने का निवडून दिले आहे. याचे भानच रहात नाही. हीच महाराष्ट्राची खरी शोकांतिका आहे...असो.
आपल्याला जनतेने त्यांचे कामे तत्पर करण्यासाठी गाव प्रतिनिधी(सदस्य) म्हणून निवडून दिले आहे. याची सदस्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. गावातील सर्व ग्रामस्त म्हणजे आपले सहकुटूंब आहे. ज्याप्रमाणे घरात देखील प्रत्येकाला थोडा फार विरोध असतो, त्याप्रमाणे गावातही विरोध असतोच. जसे की आपल्या घरातदेखील काहीजण विरोध करतात पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
परंतु संबंधित का विरोध करतो.त्याचे नेमके म्हणणे काय आहे. त्यावर आपण योग्य इलाज केला तर विरोधाचा प्रश्नच रहात नाही. परंतु दुजाभाव केला, कमी समजले आणि त्यांच्या विरोधात ञासदायक काम केले तर विरोध कधीच संपणार नाही.याकडे दुर्लक्ष होता कामा नये.
त्यासाठी सर्वांना सहकार्य करा..चांगले कर्म करा..
"चांगल्या कर्माची फळं चांगलेच मिळतात." आणि "वाईट कर्माची फळं वाईटच मिळतात"
हा तर निसर्ग नियमच आहे.
निवडून येणार्या सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन व सर्व सदस्यांकडून गावाची चांगली सेवा व कर्म घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. सर्व सदस्यांच्या भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ..!!
शुभेच्छूक:
रमेश जेठे सर
संपादक "शिर्डी एक्सप्रेस"

