shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखली कुदळ वाडी अनअधिकृत बांधकामावर कारवाई करा- पिंपरी युवासेना..!

पिंपरी चिंचवड:-चिखली कुदळवाडी परिसरात दररोज भंगाराची अनधिकृत दुकाने थाटत..
उपरोक्त विषयान्वये चिखली कुदळवाडी परिसरात दिवसेंदिवस अनाधिकृत ताबा मारून दररोज पाच ते दहा पत्र्याचे शेड बांधले जात आहे. सदर अनाधिकृत बांधकामाला सर्व सोईसुविधा सरकारी यंत्रणा करत आहे. 

शहरात इतरत्र ठिकाणी अनधिकृत बांधकामावर कारवाई होत असताना चिखली कुदळवाडी परिसरात बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. यातच पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना शहराचे विद्रुपीकरण करण्याचे काम करत आहे. 

तरी चिखली कुदळवाडी परिसरातील दिवसेंदिवस होत असलेल्या अनाधिकृत भंगाराच्या दुकानदार व दुकानावर कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी पिंपरी युवासेनेच्या वतीने आयुक्त कडे करण्यात आली. ह्यावेळेस नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, प्रतीक्षा ताई घुले, विभाग संघटक नीलेश हाके, मोमीन शेख उपस्थित होते.
close