shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिठेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनल ने मारली बाजी..!!

पिठेवाडी  ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनल ने मारली बाजी..!!
इंदापूर प्रतिनिधी: (१९ जाने २१)पिठेवाडी मध्ये अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या अशा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जय हनुमान ग्राम विकास पॅनल ला सत्ता मिळविण्यात यश आले. गेल्या पंचवार्षिक मध्ये बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत  यावर्षी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीन पॅनल उभे करून ७ जागेसाठी २२ उमेदवार उभे होते. जय हनुमान ग्रामविकास पॅनलने सात पैकी सहा जागा जिंकत गुलाल आपलाच केला आहे. विजय  घोषित केल्यानंतर  माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनी विजय उमेदवारांचे सत्कार करून अभिनंदन केले.
 तर विजयानंतर पॅनल प्रमुख महादेव शेंडगे व विष्णू वाघमोडे यांनी सांगितले की, जनतेने आमच्यावरती दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहोत. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून येत्या पाच वर्षांमध्ये विकास कामे करता येतील तेवढी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे.

 जय हनुमान ग्रामविकास पॅनल कडून वार्ड क्र.१. वैभव अनंता व्हंकडे(अनुसूचित जाती),कमल बापू बुरुंगले(सर्वसाधारण स्त्री), सिंधू नाना शेंडगे(. सर्वसाधारण स्त्री), वार्ड क्र.२ पप्पू साधू जानकर(सर्वसाधारण), वार्ड क्र.३ रामचंद्र लालासो मासाळ(नागरीकांचा मागास वर्ग), सीताबाई बबन वाघमोडे(  सर्वसाधारण स्त्री) तर श्री गुरुदेव ग्रामविकास पॅनेल कडून वार्ड क्र.२ मध्ये मनीषा आजिनाथ जानकर(नागरीकांचा मागास वर्ग  स्त्री)हे उमेदवार विजयी झाले
close