*
विद्यार्थी, शिक्षक यांचा आत्मविश्वास वाढीस लागावा म्हणून अंकिता पाटील यांनी शाळांना सदिच्छा भेट देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत..!!
इंदापूर प्रतिनिधी:(दि.२९)जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी कोरोना कालखंडानंतर सुरू होत असलेल्या बावडा जिल्हा परिषद गटातील बावडा, सुरवड, बोराटवाडी या शाळांना सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच त्यांना कोरणा पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
दहा महिन्यांच्या सुट्टीनंतर २७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इ. ५ वी ते ८ वी च्या शाळा पूर्ण काळजी व खबरदारी घेऊन सुरू झाल्या आहेत. अंकिता पाटील यांनी या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांचा आत्मविश्वास वाढीस लागावा त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यालय बावडा, श्री. हनुमान विद्यालय सुरवड, लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी या विद्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी बावडा विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत कोकाटे, सुरवड विद्यालयाचे मुख्याध्यापक भीमराव आवारे, बोराटवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ घोगरे उपस्थित होते.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती शाळेच्या पहिल्या दिवसाची उत्सुकता दिसून येत होती.

