shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हडपसर औद्योगिक वसाहतीत कचरा प्रकल्पाला भीषण आग..!

अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रणासाठी चालू आहे प्रयत्न..!!
पुणे : - पुण्यातील हडपसर भागात असलेल्या औद्योगिक वसाहतीत  कचरा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल,पोलीस, सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले आहेत. यात जिवीत हानी झाली नसल्याचे  सध्या तरी सांगण्यात आले आहे.

पुणे येथील हडपसरमधील रामटेकडी येथे औद्योगिक वसाहत आहे.याच परिसरात कचरा प्रकल्प असून,या कचरा प्रकल्पाला सुमारे पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती नागरिकांनी दिली. यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

अग्निशमन दलाच्या 11 फायर गाड्या पाठवण्यात आल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आग अद्याप देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली जात आहे.
close