shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांच्या अडचणी सोडवणे करिता पत्रकार संघ सदैव कार्यरत राहणार - शेख बरकत अली..!

श्रीरामपूर। प्रतिनिधी :
महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ या पत्रकारांच्या पाठीशी उभा राहून त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय-निवाडा करण्यास सदैव कार्यरत राहणार आहे. असे आश्वासन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी दिले. 

चांगल्या व वाईट प्रसंगांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करून जनते पुढे मांडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मिडीया च्या पत्रकारांना अधिकाऱ्यांपुढे व जनतेपुढे योग्य अशी वागणूक मिळत नाही स्वखर्चाने 24 तास परिश्रम घेणाऱ्या या पत्रकारांवर एखादे संकट उदभावले त्यावेळी त्या पत्रकारास इतरांची साथ मिळत नाही व अशा वेळी तो एकटा पडतो व त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते अशा संकटाच्या वेळी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ या पत्रकारांच्या पाठीशी उभा राहून त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय- निवाडा करण्यास सदैव कार्यरत राहणार आहे. 

सदरील पत्रकारांनी या पत्रकार संघाच्या छताखाली आल्यास पत्रकार संघ त्यांना नक्कीच आपल्या कुटुंबात सामावून घेणार असून कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांच्या सुखा दुखात सहभागी राहील आपण एकटे नसून आपल्या पाठीशी पत्रकार संघाच्या सदस्य पदाधिकाऱ्यांचा मोठा जमाव असल्याने कोणतेही भय मनाशी न बाळगता या पत्रकारांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे येणाऱ्या अडचणी ची जबाबदारी पार पाडण्यास पत्रकार संघ खंबीरपणे उभा आहे हे विसरता कामा नये.असे जाहीरपणे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी सांगितले.

दिनांक 23-01-2021 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली हे होते सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात शेख यांनी पुढे सांगितले की केबल नेटवर्क  चैनल वर गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडून होणार असल्याने या सर्व लघु चैनल ला शासनाने अधिकृत घोषित करावे त्याकरिता नवीन प्रसारण कायदा पारित करावा यासाठी पत्रकार संघ संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलन छेडणार असल्याचे शेख यांनी सांगितले.

यावेळी युनुस इनामदार, ऋषिकेश पोळ, स्वप्नील सोनार, कुमारी सायरा शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीस स्वप्नील सोनार, ऋषिकेश, शहबाज पठाण, सचिन केदार, अमन शेख, गणेश टाकीरे, अविनाश लिहिणार, युनुस इनामदार, अश्फाक पिंजारी, प्रभात शिंदे, सौ. संगीता वाबळे, प्रवीण जमदाडे, जावेद शेख, कुमारी सायरा शेख, अभिषेक सोनवणे, राजमोहंमद शेख, शेख फकीर महंमद, अकबर भाई शेख, बी.के. सौदागर, गुलाब भाई शेख, किशोर गाडे, सुभाषराव गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते. उपस्थितांचे आभार गणेश ताकपिरे यांनी मानले
close