shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संस्थांननी लावलेल्या वेशभूषा संदर्भातील फलकावर काळे करण्याचा भुमाता ब्रिगेडच्या दोन महिला व एका पुरुष कार्यकर्त्यांचा प्रयत्न..!!


संस्थान, साईभक्त व 
शिर्डीकरांमध्ये खळबळ..!!

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थानने मंदिरात व परिसरात  वेशभूषा संदर्भात फलक लावले होते. ह्या फलका बाबद भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्यास तीव्र  विरोध दर्शवला होता व  हे फलक काढून टाकावेत.अन्यथा मी तिथे येऊन हे फलक फाडीन असा इशारा दिला होता.त्यानंतर श्रीसाईबाबां संस्थांननेही ते फलक हटवले नव्हते व त्यावरून तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येण्याचे जाहीर करून हे फलक मी स्वतः फाडीन असा इशाराही देण्यात आला होता. त्या शिर्डी कडे येत असताना  त्यांना अटक करून त्यांना पुण्याला नेले होते. यासंदर्भात मोठी चर्चा झाली होती. व हे प्रकरण शांत झाले असे सर्वांनाच वाटत असताना  अचानक आज गुरुवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान दोन महिला व एक पुरुष यांनी अचानक शिर्डीत येऊन श्री साईबाबा संस्थानने वेशभूषा वापरण्या संदर्भात लिहिलेल्या सूचना व नियम  असलेल्या फलकावर काळे ऑइल सारखे पदार्थ फेकून ते काळे करण्याचा प्रयत्न केला.या संदर्भात दोन महिला व एक पुरुष यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे.



यासंदर्भात अधिक माहिती अशी की श्रीसाईबाबा संस्थानने मंदिर व मंदिर परिसरात साईभक्तांनी जाताना भारतीय वेशभूषा किंवा अंग प्रदर्शन होणार नाही. अशी वेशभूषा असावी अशी विनंती वजा आवाहान केले होते.मात्र या विनंती वजा आवाहानाला भुमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी तीव्र विरोध करून हे फलक काढण्याचा इशारा देण्यात आला होता .त्यामुळे तृप्ती देसाई यांच्या विरोधात  शिवसेना, मनसे, ब्राह्मण महासभा, ब्राह्मण महिला संघटना, शिर्डीतील नागरिक, साईभक्त , एकवटले होते व त्यांनी भुमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई व त्यांच्या साथीदारांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही .असा इशारा दिला होता. त्यांनी फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतरही संस्थांननी फलक काढले नाहीत व मुदत संपून गेल्यानंतर श्री साईबाबा संस्थांननी ते फलक काढले नसल्याने दुसऱ्या दिवशी अगोदर जाहीर करून भुमाता ब्रिगेड च्या  तृप्ती देसाई सकाळी शिर्डीकडे निघाल्या असताना त्यांना रस्त्यातच सुपा जवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन परत पाठवले होते. त्यानंतर शिर्डीतील साईभक्त व  नागरिकांनी प्रवेशद्वार चार नंबरसमोर फटाके फोडले होते. आनंद साजरा केला होता. मात्र त्यानंतर अचानक आज गुरुवार दिनांक सात जानेवारी रोजी  मनीषा शिंदे, सांगली, तसेच मनीषा पुंजे व हर्षल पाटील पुणे या तिघांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबा संस्थान च्या प्रवेशद्वारासमोर असणारे वेषभूषा संदर्भातील नियम व आवाहान करणारे फलकावर काहीतरी पदार्थ फेकून ते काळे करण्याचा प्रयत्न केला .तेथील साईबाबा संस्थान सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले व पोलिसांना कळवले व पोलिसांनी तेथे येऊन या तिघांना ताब्यात घेतले आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे करत आहेत. या प्रकारामुळे शिर्डीत पुन्हा यासंदर्भात वातावरण तापणार अशी चर्चा सुरू आहे.
close