हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दिनांक १७ जानेवारी रविवार रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तलाब कट्टा परिसरातील अंदाजे आठ ते दहा ब्रास किमती पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचा अवैधपणे साठवून ठेवलेला रेती साठा जप्त केला असून सदर कार्यवाहीमुळे वाळू तस्करामध्ये खळबळ उडाली आहे. सदरचा रेती साठा तलाठी प्रदीप इंगोले यांनी ताब्यात घेतला असून सदरचा रेती साठा कुणी आणला याबाबत पोलिसांतर्फे तपास करून अवैधपणे रेती साठा करनारेवर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री.एम राकेश कलासागर,अपर पोलीस अधीक्षक श्री.यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एस.एस घेवारे, पोलीस अमलदार दिलीप बांगर , ज्ञानदेव घुगे ,शेख जमीर, प्रदीप राठोड , भिसे यांच्या पथकाने केली.

