चाळीसगाव । प्रतिनिधी(मंगलसिंग राजपूत):
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलने तब्बल ८-० ने विजय मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली व गावातील नवे व तरूण उमेदवारांना काम करण्याची संधी गावकऱ्यांनी दिली. विरोधकांनी मात्र आपली सत्ता यावी यासाठी खुप प्रयत्न केले पण शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
गेल्या काही वर्षांपासून एकहाती सत्ता आलेली नव्हती तर परिवर्तन पॅनलने एकहाती सत्ता घेत विरोधकांना चांगलाच धडा शिकवला.
परिवर्तन पॅनलचे निवडून आलेले उमेदवार..
अंबादास चिपा माळी,विनायक झुंबर जगताप,नबाबाई कोमलसिंग कच्छवा,संतोष बालचंद राठोड, अनुसया रोहीदास जाधव,पुष्पाबाई प्रकाश राठोड,पल्लवी राहुल कच्छवा,दगडू गबा बागूल.. या सर्व नवनिर्वाचित निवडणूक आलेल्या उमेदवारांचे मंगल राजपूत युवा मंच व परिवर्तन पॅनल तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

