इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी १ लाख २९ हजार ६६६ मतदारांनी बजावला हक्क..!!
इंदापूर प्रतिनिधी :( दि.१६ जाने.२१)इंदापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक लागल्या आहेत यामध्ये ३ ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असून ५७ ग्रामपंचायतीसाठी दि.१५ जानेवारी रोजी प्रत्यक्षात मतदान झाले आहे. १ लाख ५८ हजार ५९९ एकूण मतदारांपैकी १ लाख २९हजार ६६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामुळे सरासरी मतदान ८१.७६ टक्के झाले.
इंदापूर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायती साठी झालेले ग्रामपंचायत सरासरी टक्केवारी पुढीलप्रमाणे :- भिगवण ७९.८९टक्के, तक्रारवाडी ८२.३४, पोंधवडी ९०.२१ टक्के, कुंभारगाव ८९.३४टक्के, अकोले ८६.०७ टक्के, शेटफळ ८४.८३टक्के, निंबोडी ८८.९९टक्के, निरगुडे ८९.६३टक्के, पिंपळे ८६.४७टक्के, भांडगाव ८५.२७टक्के, भोडणी ७८.३८टक्के, पिंपरी बुद्रुक ८९.५४ टक्के, नरसिंहपूर ८३.०७टक्के, टण्णू ८८.८३ टक्के, गिरवी ९१.८९ टक्के, गोंदी ओझरे ९०.६५ टक्के, चाकाटी ९०.१४टक्के, पिठेवाडी ८९.९०टक्के, भादलवाडी ६९.५२, कळस ८३.८९ टक्के, भरणेवाडी ८०.७२टक्के, वालचंदनगर ५८.९२ टक्के, कळंब ७७.२७टक्के, अंथुर्णे ८१.५०टक्के, पळसदेव ८५.९५ टक्के, रुई ८३.८५ टक्के, गलांडवाडी नंबर 1/नरुटवाडी ८७.३६ टक्के, लोणी देवकर ८८.४२ टक्के, भावडी ९०.११ टक्के, चांडगाव ९०.२३ टक्के, बळपुडी ९६.८८ टक्के, सरडेवाडी ८६.९७ टक्के, शहा ९०.९१ टक्के, बाभूळगाव ८७.३४ टक्के, गलांडवाडी नंबर 2- ९२.१० टक्के, तरंगवाडी ८९.०२टक्के, वरकुटे खुर्द ८४.४६ टक्के, काटी ८३.५४ टक्के, रेडा ८७.८९, सराफवाडी ९०.१९ टक्के, पिटकेश्वर ८९.३५टक्के, सणसर ७५.११ टक्के, तावशी ७८.९२ टक्के, सपकळवाडी ८६.०७ टक्के, लासुर्णे ७४.६१ टक्के, चिखली ९३.१४ टक्के, निमगाव केतकी ८०.९८ टक्के, कौठळी ७४.३८टक्के, व्याहाळी ८५.५६ टक्के, कडबनवाडी ८८.७६टक्के, कचरवाडी (निमगाव केतकी) ९१.२२ टक्के, निमसाखर ७८.७९टक्के, गोतंडी ८५.०९टक्के, निरवांगी ८२.७३टक्के, हगारवाडी ८७.४५टक्के, दगडवाडी ८५.३९टक्के, घोरपडवाडी ८२.०४ टक्के, अशा पद्धतीने मतदान झाले . इंदापूर तालुक्यातील चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निकालाची आतुरता लागली असून यावर अंतिम निकालाची काही काळासाठी म्हणजेच १८ तारखे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

