प्रतिनिधी । मोहन शेगर
नेवासा येथील तालुका आरोग्य रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा प्रारंभ मा.उदयनदादा गडाख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या लसीचा मान आरोग्य कर्मचारी यांना मिळाला.
गेल्या मार्च 2020 पासून कोरोनाच्या सावटाखाली आपण होतो.त्या आजारावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्याचे भूषण राज्याचे जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख साहेब यांच्या सूचनेनुसार नेवासा तालुक्यात सर्वसामान्य जनता, वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी,डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील अधिकारी –कर्मचारी,समाजसेवक,गावागावतील पदाधिकारी,ग्रामस्थ यांच्या सहकाऱ्यातून कोरोनावर मात करण्यात मोठया प्रमाणात यश मिळविले आहे, त्यांचे सर्वांचे मी यानिमित्ताने आभार मानतो ,धन्यवाद देतो,आता कोरोनाची लस आल्याने कोरोनाच्या संकटाला आपण सामोरे जाऊ शंकतो, असे प्रतिपादन मा.उदयनदादा गडाख यांनी यावेळी औपचारिक रित्या बोलताना केले.
यावेळी नेवासा तहसीलदार सुराणा साहेब तालुका आरोग्य अधिकारी सुर्यवंशी साहेब जिल्हा ग्रामिणचे प्रभारी डाँ बागवान पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे पाटिल,उपसभापती किशोर जोजार,नेवासा मार्केट कमिटीचे सभापती, मुळा कारखाना संचालक कडुबाळ कर्डीले पाटील,बाळासाहेब सोनवणे पाटील, कार्यकर्ते,पत्रकार बांधव व आरोग्य कर्मचारी सेवक आशा कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

