shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहूरोड मध्ये व्हाट्स अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल तसेच नग्न फोटो पाठवून महिलेचा विनयभंग..!!

पुणे:-एका मोबाईल क्रमांकावरुन बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने महिलेला व्हाट्स अ‍ॅप या सोशल मीडियावर व्हिडीओ कॉल करुन शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच महिलेच्या मोबाईलवर नग्न फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार 20 ते 23 जानेवारी या कालावधीत देहूरोड येथे घडला.


8721669937 या क्रमांकावरून बोलणा-या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8721669937 या क्रमांकावरुन अनोळखी आरोपीने पीडित महिलेला फोन केला. तसेच व्हाट्स अ‍ॅपवर व्हिडीओ कॉल करुन आरोपीने महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर आरोपीने नग्न अवस्थेतील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
close