shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांना लोकसंवाद पुरस्कार जाहीर..आमदार शामसुंदर शिंदे यांनी अभिनंदन करून शुभेच्या दिल्या ..!!



लोहा  (प्रतिनिधी ) :

लोहा येथील रहिवासी  तथा अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचा पुरस्कार अड.एल.जी .पुयड यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच जाहीर केला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्री. यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरी जि. नांदेड च्या वतीने मागील पंधरा वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकसंवाद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

 सन २०२१ या पुरस्काराचे मानकरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च शिक्षणात 'फुले पॅटर्न' निर्माण करणारे अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ , मराठीचे थोर साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना दि. ३१जानेवारी २०२१ रोजी सिंधी ता. उमरी येथे होत असलेल्या १५व्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते लोकसंवाद पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, महावस्त्र व प्रशस्तीपत्र असे आहे.विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना आजपर्यंत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा बहुमान महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा लोहा, कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर पाटील शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे, लोहा खरेदी-विक्री संघाचे उपसभापती श्यामअण्णा पवार, शिक्षक नेते विठूभाऊ चव्हाण, संचालक सुधाकर सातपुते, पत्रकार अशोक सोनकांबळे,  मुर्तुजा शेख, प्रेमनाथ खरात यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
close