मंगेश औताडे (निर्भीड पत्रकार ) :
राहुरी- घरची परिस्थिती अतिशय बिकट त्यातुन स्वतचा तसेच घरातील उदरनिर्वाह आणि त्यात स्वत:ची- समाजाची-महाराष्ट्राची मान उंचावेल अशी पैलवानकीतुन उत्कृष्ट कामगिरी..!
या सर्व गोष्टी एका आदिवासी युवकाच्या वाटेला आल्या. तसेच शेकडोहुन पुरस्कार (ट्राॅफी) मिळवत राहुरी तालुका तसेच महाष्ट्राची मान या सखा नामक युवकाने उंचावलेली आहे, ही गोष्ट लक्षात घेता महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पुढार्यांनी-राजकीय पक्षांनी पहिलवान सखा बर्डे यास आश्वासन दिले की तुझी परिस्थीती अतिशय गंभीर असून तु त्यावर मात करत आज समाजाची तसेच महाराष्ट्राची मान उंचावली आहे, परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे तुझा तसेच कुटुंबाचा उदारनिर्वाह व्हावा. यासाठी आम्ही तुला आर्थिक मदत मिळवुन देऊ या आशेवर आजही परिस्थीतीशी सखा बर्डे हा युवक झुंज देत असून अनेक राजकीय पुढार्यांनी सखा यास दिलेला शब्द पुर्ण होऊन सखा बर्डे यास न्याय भेटेल का ? याकडे संबधीत महाराष्ट्रातील पत्रकार-नेते-सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष लागले असून याप्रकरणात आदिवासी समाज सेवक तथा पत्रकार मंगेशजी औताडे यांनी या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

