shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात डुक्कर खिंडीत कुख्यात गुन्हेगाराचा खून..!!


पुणे:-पुण्यातील वारजे परिसरात एका कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला. डुकर खिंडीतील एका पुलाखाली रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह सापडल्याने पुणे शहरात खळबळ उडाली  आहे. पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

जग्या उर्फ जगदीश पारध्ये (वय 28, रा. म्हाडा कॉलनी, वारजे) असे खून झालेल्या तरुणाचे  नाव आहे. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास काही नागरिकांना डुक्कर खिंड परिसरात एक मृतदेह दिसला. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्यांनी याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली.


ओळख पटविण्याचे काम सुरू असताना हा मृतदेह कुख्यात गुंड जग्या पारधे याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना आणून ओळख पटवून घेतली.

दरम्यान खुनाच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
close