श्रीरामपूर । प्रतिनिधी: दत्तनगर येथील नानासाहेब शिंदे मित्रमंडळ व मैत्री ग्रुपने कोरोना महामारीच्या काळात समाजातील गरजू व दुर्बल घटकांना जेवण, अन्नधान्य, भाजीपाला इतर खाद्य वस्तू व औषधे तसेच क्वॉरंटाईट केलेल्या लोकांची निवासाची व्यवस्था सुयोग्य व मानवीय दृष्टीकोनातून केल्याबद्दल वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघाच्या वतीने राज्याचे माजी मंत्री व विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल कोरोना वॉरियर अवॉर्ड -२०२१ " देण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सौ. संगीताताई शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पठारे, डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी दत्तनगरचे माजी सरपंच व मैत्री ग्रुपचे अध्यक्ष पोपट निकम सर, दत्तनगरचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य नानासाहेब शिंदे यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तर जनाभाऊ खाजेकर, बाळासाहेब विघे, भिमराज बागुल, अरूण बागुल, प्रदिप गायकवाड, बापू शिंदे, उदय कटारीया, शरद भणगे, सुरेश शिवलकर, बाबा दुशिंग यांनाही सन्मानीत करण्यात आले.

