shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 23 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत जमावबंदी आदेश लागू-जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी

सावळीविहीर । प्रतिनिधी :
जिल्ह्यामध्ये कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अहमदनगर जिल्ह्यात मध्ये 23 फेब्रुवारी पासून ते 15 मार्च रात्री बारा वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये 144 कलम जारी करण्यात आला आहे. 

हा जमाव बंदी आदेश जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना निर्बंध राहणार आहेत तसेच अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर लोकांना बंदी राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये आज जाहीर केले आहे.

 या आदेशात म्हटले आहे की, कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग निवारण कायदा त्याच्या अंतर्गत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून तसेच जिल्ह्यामध्ये 144 कलम (जमावबंदी )आदेश जारी करण्यात आला आहे ,23 फेब्रुवारी पासून तर 15 मार्चपर्यंत हा 144 कलम जिल्ह्यात लागू राहणार आहे.जिल्ह्यांमध्ये त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये. लग्नसमारंभासाठी फक्त पन्नास व्यक्तींनाच परवानगी देण्यात आलेली आहे.तेही मास्क वापरून ,सॅनिटायझर वापरून, स्वच्छता ठेवून ,सामाजिक दूरचे अंतर बाळगूनच पन्नास व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. 

या 50 व्यक्तीमध्ये वधू-वर, पालक नाते मंडळी व आचारी, बँडवाले या सर्वांचा समावेश राहणार आहे. शासकीय निमशासकीय व शाळा महाविद्यालयात सर्वांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे .तसेच सॅनिटायझर ठेवणे, साबण पाणी ठेवणे अनिवार्य राहणार आहे. अंत्यसंस्कार किंवा अंत्यविधीसाठी फक्त वीस लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे, तसेच सकाळी 9 ते रात्री नऊ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी राहणार आहे, त्यानंतर  ती राहणार नाही. तसेच जिल्ह्यातील सर्व समारंभ राजकीय धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा सण-उत्सव उरूस यात्रा येथे निर्बंध टाकण्यात आले आहेत.प्रवास करताना बस रेल्वे व खाजगी वाहनातून नागरिकांनी मास्क वापरल्याशिवाय प्रवास करणे बंधनकारक राहणार आहे.

असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी एका परिपत्रकाद्वारे काढले असून त्याची सक्त अंमलबजावणी जिल्ह्यात 23 फेब्रुवारी मंगळवार पासून सुरू होणार आहे.
close