shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ जनाधार सामाजिक संघटनेचे प्रकाश पोटे यांच्या हस्ते करण्यात आला..!

नगर तालुक्यातील निबोंडी,दहिगाव साकत खुर्द,वाटेफळ,रुईछत्तीसी आदी गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली.

नगर प्रतिनिधी:- शिवा म्हस्के :
सध्या संपूर्ण देशामध्ये आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे 31 जानेवारी हा पल्स पोलिओ लसीकरण दिन म्हणून लावण्यात येतो त्याच पार्श्वभूमीवर आज नगरतालुक्याती निंबोडी येथील ज्ञजिल्हा परिषदेच्या शाळेत पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यात आला याचा शुभारंभ जनाधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या हस्ते लसीकरणाचा डोस देऊन करण्यात आला.



तसेच दहिगाव साकत या ठिकाणी  पत्रकार शिवा म्हस्के यांच्या हस्ते पोलिस लसीकरणाचा डोस दिला .या वेळी आशा सेविका आशा जाधव, अंगणवाडी सेविका अलका जरे, आशा चंदने, बाळासाहेब वाघ, श्री राम वारे, गुलाब पठाण, अमित गांधी, दीपक गुगळे, अमोल भंडारे, डॉक्टर चंद्रकांत देशमुख आणि आशा सेविका उपस्थित होत्या.
close