अकलूज शाखेच्या सचिवपदी
सौ.रुक्मिणी साबळे-कांबळे यांना प्रथमच महिला सचिव होण्याचा मान..!!
बावडा येथील अकलूज शाखेच्या महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटना सचिव पदी सौ.रुक्मिणी साबळे-कांबळे यांची निवड..!!
इंदापूर प्रतिनिधी: (१५ फेब्रु.२०२१). बावडा गावच्या सौ रुक्मिणी दादासो कांबळे-साबळे यांची महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटना अकलूज शाखेच्या सचिव पदी निवड करण्यात आली.
अकलूज शाखेच्या महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटना च्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रथमच रुक्मिणी साबळे या एका महिलेला सचिव पदी संधी देण्यात आल्याने अकलूज आगार कर्मचारी त्यांच्याबरोबर बावडा गावातील जनतेमध्ये विशेष कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.
रुक्मिणी साबळे या २०१४ साली खेळाडू कोट्यातून प्रथमच अक्कलकोट या ठिकाणी वाहक म्हणून रुजू झालेल्या नंतर २०१८ ला पहिल्या महिला इंटक आगार सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या या या कामाचा विचार करिता महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज येथील संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रुक्मिणी साबळे यांची सचिव पदी निवड करण्यात आली.तर अध्यक्ष पदी विजय लंगोट , उपाध्यक्ष हरी इंगळे यांची निवड करण्यात आली. आणि सर्व पदाधिकारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बावडा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे यांनी सर्व नुतून पदाधिकारी यांचे अभिनंदन केले .

