shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लाभार्थ्यांच्या परस्पर घरासाठी दिलेली जमीन अपहार प्रकरणी कार्यवाहीस मुख्यकार्यकारी आधिकाऱ्याची टाळाटाळ..!!

सावरगाव नसरत येथील प्रकार


लोहा : लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे जमीन भुसंपादन करुन १९७५ रोजी बेघर असेलेल्या १९ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली.

घरांसाठी वाटप करण्यात आलेली जमीन ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी आर्थिक व्यवहार करून लाभार्थ्यांच्या परस्पर गावातील अन्य २५ जनाच्या नावे करुन देण्यात आली. त्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज बिग्रेडचे जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील कदम यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली.

त्या अनुषंगाने चौकशी करून चौकशी अवहाल मुख्यकार्यकारी आधिकारी नांदेड यांच्याकडे पाठवण्यात आला. परंतु चार ते पाच महिन्यापासून या प्रकरणी कार्यवाही करण्यास मुख्यकार्यकारी अधिकारी टाळाटाळ करत करत असल्याची माहिती तक्रारदार जगदीश पाटील कदम यांनी दिली.

लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथील गट.नंबर. ३४७, सर्व्हे नंबर १७० मधील ३५ आर जमीन शासनाने भुसंपादीत करुन १९७५ रोजीच्या एभुसंपादन आदेश क्र. ७४ दिनांक १७/१०/१९७५ रोजी बेघर भुमीहीन असलेल्या १९ लाभार्थ्यांना निवाऱ्यासाठी देण्यात आले. त्या लाभार्थ्यांच्या परस्पर ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी गावातील अन्य व्यक्तीकडून प्रत्येकी पन्नास हजार रुपये घेऊन ती भुसंपादन जमीन अन्य व्यक्तीच्या नावे लावून नमुना नंबर ला नोंद घेण्यात आली. चौकशीला आलेल्या अधिकारी शेटवाड (विस्तार अधिकारी पंचायत) यांना हाताशी धरुन तहसीलदार लोहा यांचा आदेश नसताना चौकशी अवहालात तहसीलदार लोहा यांचा आदेश असल्याचे दाखवून तक्रारदार व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची दिशाभूल करून चुकीचा चौकशी अवहाल सादर केल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. 

विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. या प्रकरणी तक्रारदाराने सर्व पुरावे देऊन अद्यापर्यंत मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. कार्यवाहीस टाळाटाळ केल्यास पुन्हा एकदा आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदा यांनी दिला. या प्रकरणी विभागीय आयुक्त काय कार्यवाही करतात याकडे सबंध जिल्हाचे लक्ष लागले आहे.
close