shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.भा.भ्रष्टाचार निर्मुल संघर्ष समिती हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष व सेनगांव तालुका कार्यकारीणीची निवड..!!



हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख) दि.२५,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या संपर्क कार्यालयात दि.२४ फेब्रुवारी बुधवार रोजी समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीतराव दौलतराव तिडके यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष पदी माजी सरपंच रमेशराव कुटे यांची तर सेनगांव तालुका कार्यकारिणी ठराव घेऊन गठीत करण्यात आली.



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीतराव तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सेनगांव येथील संपर्क कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून संघटनात्मक बांधनी करण्यात आली.यावेळी समितीच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच रमेशराव मानकोजी कुटे यांची निवड करण्यात आली.तसेच समितीच्या सेनगांव तालुकाध्यक्ष पदी गजानन रामचंद्र टेकाळे,महिला तालुकाध्यक्ष पदी सौ.वंदनाताई थिटे,उप तालुकाध्यक्ष पदी मधुकर देशमुख,गंगाधर जिरवणकर,युवा तालुकाध्यक्ष पदी नितिन कुटे,तालुका प्रसिध्दीप्रमुख पदी पत्रकार विश्वनाथ देशमुख,तालुका सचिव राजुभाऊ देशमुख,आश्रुबा खंदारे,सह सचिव अजाबराव सुर्वे,तालुका सल्लागार सखाराम आकले,शहराध्यक्ष संतोष बिडकर,युवा उप तालुकाध्यक्ष रामकीशन कुटे यांची ठराव घेऊन निवड करण्यात आली व अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीतराव तिडके,जिल्हा कार्याध्यक्ष रमेशराव कुटे,जिल्हा अध्यक्ष किसान विभाग शंकरराव देशमुख,जिल्हा सिक्रेटरी विश्वनाथ नरवाडे,जिल्हा कोषाध्यक्ष सौ.आशाताई घोडके आदींसह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close