उदगीर प्रतिनिधी:- दररोज सुर्य उगवतो तो मावळतो वेळ येतो निघून ही जातो. हे आपण दृष्टी असणारे रोज पहातो अनुभव घेतो पण जे मुल दृष्टीहीन आहेत त्यांना दृष्टी देणाचे काम उदयगिरी लायनस नेत्र रुग्णालय येथील चे अरूणा अभय ओस्वाल रिसोरस सेंटर फार बलाईड उदगीर
हे करत आहेत याचा खरोखर उदगीर वासीयांनचा अभिमान आहे असे ते आयोजीत उदयगीरी लाॅयन्स अंध व पुनर्वसन केंद्राच्या आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ रामप्रसाद लखोटीया सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुंडपे सर,सुरेश देबडवार,दै.केसरीचे उपसंपादक संतोष अलेवाड,लक्ष्मीकांत बेंबडे,रसुलदा पठाण,अर्चना पैके,
दिपक बलसुकर,हे उपस्थित होते तर मंचावर उपस्थित एम.आर.कुलकर्णी,शिवम चणगे,विजय देबडवार,एस एस पाटील सर,गणेश मुंडे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा अंध मुलांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केले.
अध्यक्षीय भाषणात डाॅ रामप्रसाद लखोटीया बोलताना अंध मुले आहेत हे पहात न बसता हे स्वताःच्या पायावरती स्वावलंबी कसे राहातील यासाठी सर्व ते उपाय करणे गरजेचे आहे मग तो छोटा मोठा व्यवसाय असेल किंवा नौकरी असेल तसेच हे सर्व संभाळत असताना या कार्यासाठी दानशुराची पण मोठी गरज आहे .असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात आव्हान ही केले.
उपस्थित मान्यवरांनी आप आपले विचार मांडले तर व आपण ही काही तरी समाजाचे देणे लागतो असे समजून एक पाऊल पुढे टाकत मदतीला धावत येतील असा विश्वास दिला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एस.एस.पाटील सर यांनी केले.

