shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा...!

अहमदनगर: जिल्हयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असून त्यामध्ये कोटपा 2003 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पोलिस मुख्यालय अहमदनगर येथे एक दिवसीय कार्यशाळी घेण्यात आली. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत कोटपा 2003 कायदा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी कलम 5,कलम 6 अ व 6 ब, 7 या सर्व कलमांची माहिती देण्यात आली. 

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी सर्व पोलिस प्रमुखांना आदेशित करुन कोटपा कायद्याअंतर्गत जिल्हयात प्रभावी कार्यवाही करण्याबाबत सांगितले
close