नगर । प्रतिनिधी( शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व समर्थ जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी समाजात प्रकाश देणाऱ्या आणि विचारांनी विचारांची ज्योत पेटवून संदेश देणारा अप्रतिम सोहळा पहावयास मिळाला.
रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतुन शाळेचा परिसर फुलून गेला होता. पर्यावरण, स्वच्छता सारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, ताणतणावाच्या वातावरणात भाषा जात प्रांत यांचा भेदाभेद न ठेवता गावात शिक्षक व विद्यार्थ्यांची देखील मोठी भूमिका ही महत्त्वाचीआहे असे शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रविण डावखरे यांनी व्यक्त केली, शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या च्या वतीने अतिशय सुंदर वेशभूषा व छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले .
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, या सर्वांचे चालते बोलते देखावे पाहण्यासारखे होते,या कार्यक्रम प्रसंगी आपल्या पाल्याचे कला गुण पाहण्यासाठी महिला भगिनी उपस्थित होत्या.
प्रसंगी समर्थ जुनियर कॉलेज चे प्राचार्य श्री इंगळे सर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री प्रवीण डावखरे सर डावखरे मॅडम, विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व समर्थ जुनियर कॉलेज मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थीनींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व भविष्यात शाळेच्या प्रगतीसाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले.
उपस्थितांमध्ये ग्रामपंचायत सदस्य श्री संजय कोतकर. सुनील भापकर, नितीन कोतकर दादासाहेब आगळे, किरण कोतकर, दादासाहेब जावळे, राजेंद्र मोहिते सचिन सकट इ. नागरिक सोशल डिस्टन्स चे पालन करून उपस्थित होते.

