शिक्षक समिती इंदापूर शाखेच्यावतीने साविञीच्या लेकींना कोविड योद्धा पुरस्कार देवून सन्मान..!!
गटविकासअधिकारी विजयकुमार परिट व गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांचा विशेष पुरस्कार देवून सन्मान..!!
शिक्षक समितीचे काम उल्लेखनीय व शिक्षकांचा गुणगौरव कार्यक्रम कौतुकास्पद - सभापती स्वाती शेंडे.
इंदापूर प्रतिनिधी: शिक्षक समितीच्या वतीने पंचायत समितीचे अधिकारी , शिक्षक व कर्मचारी एकूण ७१ जणांना कोविड योद्धा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा इंदापूरच्यावतीने कोरोना काळात शाळा बंद असताना मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॕनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रमाचे व्हिडीओ निर्मिती व चाचणी तयार करणारे ३९ महिला शिक्षिका ८ तंञस्नेही १७ विशेष काम करणारे व ५ अधिकारी , २ कर्मचारी असे ७१ जणांना कोरोना शासकीय नियम पाळून दोन टप्यात सभापती स्वाती शेंडे , उपसभापती संजय देहाडे , माजी सभापती पुष्पा रेडके , सदस्य देवराज जाधव , गटविकासअधिकारी विजयकुमार परिट , गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे , शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव बागल , सरचिटणीस सुनिल मखरे , शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ , उपसभापती वसंत फलफले , माजी सभापती किरण म्हेञे , नितिन वाघमोडे , विलास शिंदे , सुनिल शिंदे यांचे हस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , शाल , पुष्पहार देवून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रताप शिरसट , भारत ननवरे संजय भोंग , अशोक क्षिरसागर , मैनुद्दीन मोमीन , नितीन कदम , विनय मखरे , शिवाजी शिंगाडे , दिनेश काळे , संभाजी सूर्यवंशी , महेश थंबद , संभाजी गायकवाड , राहुल कानगुडे , नाना पवार , राजेंद शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ यांनी केले.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी व आभार वसंत फलफले यांनी मानले.
सत्कार समारंभ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माजी संचालक भारत ननवरे , प्रताप शिरसट , संतोष हेगडे यांनी विशेष प्रयत्न केले.

