shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वळके ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांसाठी सुवर्णसंधी !!


मुरूड। प्रतिनिधी(विकास मेहेतर):

वळके ग्रामपंचायत तरुणांना एक महिन्याच प्रशिक्षण देणार आणि सोबत नोकरीची संधीसुद्धा देणार!!

दिनांक ०४/०२/२०२१ रोजी वळके येथे पार पडलेल्या भव्य हळदीकुंकू समारंभात “सन्मान स्त्रीशक्तीचा, संदेश स्वच्छतेचा”  या संदेशाच्या माध्यमातून सरपंच किशोर काजारे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना दिली रोजगाराची सुसंधी!!

ग्रामपंचायत वळके आणि प्रथम foundation यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक ०८/०२/२०२१ पासून वळके येथे अत्याधुनिक प्लंबिंग तंत्रज्ञान प्रशिक्षण सुरु होत आहे. 

या कोर्स मध्ये समाविष्ट होण्यासाठी अटी:
1. उमेदवाराचे वय 18 ते 35 असावे. 
2. शिक्षण: किमान 7 वी पास
3. ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारास प्राधान्य 
प्रशिक्षणाचा कालावधी:
 1 महिना (रोज 2 तास)

प्रशिक्षण स्थळ : वळके 

या कोर्सचे फायदे:
1. या प्रशिक्षणात अत्याधुनिक प्लंबिंग तंत्रज्ञान प्रात्यक्षिक शिकवले जातील. 
2. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असेल. 
3. कोर्स पूर्ण होताच उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येईल.
4. कोर्स पूर्ण होताच लगेच उमेदवाराला मुंबई व परिसरातील कारखान्यात नोकरीची संधी दिली जाईल. 
5. कोर्स पूर्ण करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला २५०० रुपये किमतीचे toolkit मोफत दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५/०२/२०२१ ते ०६/०२/२०२१ या दोन दिवसात ग्रामपंचायत वळके कार्यालयात संपर्क साधावा. आपले नाव, आधार कार्ड क्र. व मोबाईल क्र. ग्रामपंचायतीत द्यावे. आपली online नोंदणी करून प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल. अशी माहिती ग्रुप ग्राम पंचायत वळके सरपंच मा.श्री किशोरजी काजारे यांनी दिली आहे.
close