shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात संगीतमय ध्यान-धारणा शिबिर संपन्न ..!!

हिंगोली ।‌ प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील जिल्हा परीषद शाळेमध्ये दि.२३ फेब्रुवारी मंगळवार रोजी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तणावमुक्त होण्यासाठी संगीतमय ध्यान-धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे कर्तव्य १२ तासापेक्षा जास्त असते.त्यांना कर्तव्याचा ठराविक वेळ नसतो अशा अशा अनियमित वेळेमुळे त्यांचे स्वत:चे व कुटुंबियाकडे दुर्लक्ष होत असते.गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना या विषाणु पासुन होणारा कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असुन अजुन ही या विषाणुने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी डोके वर काढायला सुरुवात केली असून सदर कोविड काळ हा पोलीसासाठी अतिशय बिकट व कष्टमय झाल्यामुळे ताण-तणावाची वाढ झाली आहे.पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबीयांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी हिंगोली पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर यांनी पुढाकार घेऊन यशदा पुणे येथे कार्यरत असलेले मेडीटेशन ट्रेनर प्रा.डाँ.शिवाजी कुचे(अमरावती)यांना हिंगोली जिल्ह्यात आमंत्रित करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगांव येथे संगीतमय ध्यान-धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील,पोलीस उप निरीक्षक अभयकुमार माखणे,सहायक पोलीस निरीक्षक दिक्षा लोकडे,अनिल भारती,कोरडे,नाईक,शिंदे,पत्रकार गजानन वाणी, पत्रकार विश्वनाथ देशमुख सह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close